मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

सुरी

२५ फेब्रुवारी, २०२१

‘आसमाँनमें… टॅडॅड्यॅंव्.. लाखों तारें…’ असं तब्बेतीत गाणाऱ्या नि पोलिसानं शर्टाची इस्त्री घालवली तरी मनावर न घेता दिलखुलासपणे ‘क्या साब!’ असं विचारणाऱ्या खबऱ्यासारखी स्मार्ट असायची इथली गरिबी.

आता तिच्यात एक कडूपणा आलाय.

आपण कुठल्या प्रवाहाच्या धारेला लागलो आहोत हेही न कळता चणे नाहीतर कचऱ्याच्या पिशव्या विकू पाहणाऱ्या करकरीत वृद्ध चेहऱ्यांवरचा निष्प्राण भाव झाकोळतो आता अधूनमधून तिच्या चेहऱ्यावर.

गर्दीला त्याची दाद नाही नि आहेही.

पण धावण्याला पर्याय नाही.

‘उद्या धावायला बंदी झाली तर?’ अशा धास्तीची थंडगार सुरी आहे प्रत्येकाच्या मानेला टेकलेली.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2021/02/blog-post_34.html