मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग
    आजीची गोष्ट · ५

    आजीची गोष्ट ०५

    (भाग ०४) तिला शिक्षणाची हौस होती, म्हणजे किती होती! तिच्या लहानपणी तिला फारसं शाळेत जाता आलं नाही. काळही वेगळा, मुलींना शिकवण्याला फारसं महत्त्वच नव्हतं. ती ज्या खेड्यात जन्मली तिथे शाळाही नव्हती तेव्हा चौथीच्या पुढे. शिवाय घरची गरिबी. सकाळी कामं करून शाळेत जायची, तर जाताना काही…

  • · ब्लॉग

    मेहंदी से जला के उंगलीयाँ...

    आमच्या इमारतीबाहेर कुंपणबिंपण होण्याच्या पूर्वी तिथे मेंदीची झुडपं होती. त्याची पानं वाटून एखाद्दोनदा हाताला बांधण्याचा उपद्व्याप केलेला आठवतो. पण आमची खरी भिस्त मेंदीच्या तयार कोनांवरच असायची. ते कोन चांगले आहेत ना, असं दुकानदाराला चारचारदा विचारून मग आणायचे. नि तरी तो अडकायला…

  • · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ७

    राहत्या शहराचे लागेबांधे ०७

    ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण…

  • · ब्लॉग

    त्रांगडं

    माझा एक प्रियकर म्हणायचा, "माणसांच्या आजूबाजूला असण्यातून ताकद शोषून घेतो मी. एकटा असलो, तर कंटाळून-विझून जातो." मला तेव्हा अजब आणि आकर्षक वाटलं होतं हे, इतकी स्वतःच्या माणूसघाणेपणाविषयी खातरी होती. आता काही वर्षांनंतर वाटतं, अर्थात, दुसरा काय रस्ता असतो आपल्यासारख्या नास्तिक…

  • · ब्लॉग

    या मौनाची जात निराळी

    या मौनाची जात निराळी

    उंबऱ्यापाशी अडते पाऊल, त्या प्रहराची आण निराळी

    या मौनाची जात निराळी.

    कडू बोलणे पात दुधारी, पण डोळ्यांची साक्ष वेगळी

    या मौनाची जात निराळी.

    …

  • · ब्लॉग

    कासवकाळ

    अधूनमधून माझ्यातलं कासव डोकं वर काढतं. एकदा त्यानं डोकं वर काढलं की मला गुपचूप पाय पोटाशी घेऊन मान आक्रसून घेऊन कुठल्यातरी अंधाऱ्या कोपऱ्यात दडून बसण्याची अनावर हुक्की येते. खूप इंट्रेस्टिंग कामं, माणसं, कार्यक्रम, मजेच्या संधी, आमंत्रणं असतात. पण कासव पुन्हा तळाकडे सूर मारेस्तो…

  • · ब्लॉग

    ऐकत राहायला हवं

    कुणाचं काही ऐकू नयेसं वाटतं. कुणी काही बोलू लागलं तर त्यावर आवाज चढवून आपणच बोलत राहावं वाटतं. नव्हे, तसं केल्यावाचून राहवतच नाही. फक्त आपलाच आवाज ऐकू येत राहतो मोठ्यांदा. नि तरी समाधान होत नाही, तहान शमत नाही, जीव शांतवत नाही. कशानं हे असं? कसला राग येतो? कसले अपमान सलतात?…

  • · ब्लॉग

    आस्वादकाच्या मेंदूतलं घड्याळ आणि इतर चित्तचक्षुचमत्कारिक गोष्टी

    कुठलीही गोष्ट वाचता-ऐकता-बघताना माझ्या डोक्यात एक अत्यंत कस्टमाइज्ड घड्याळ कम् कॅलेंडर चालू होत असतं. उदाहरणार्थ, १९२८ साली घडतीय का ही गोष्ट? बरं. पण १९२८ म्हणजे? या आकड्यांनी मला काहीच बोध होत नाही. म्हणजे भाऊआजोबा प्लेगातून मरता मरता वाचलेलं ते वर्षं. आत्या झाली होती, पण काका…

  • · ब्लॉग
    मला प्रवास आवडत नाहीत · ३

    मला प्रवास आवडत नाहीत - ३

    एकीचं शाळेत शिकलेलं फ्रेंच आणि बाकीच्यांचं फ्रेंचचं एकअक्षरकळलतरशपथ-आकलन घेऊन पॅरिसात उतरलो आम्ही, तेव्हा गंतव्य मेट्रो स्टेशन 'इथ्थेच जवळ' आहे हे माहीत होतं. आमची किल्ली घेऊन एअरबीएनबीत साफसफाई करणारी काकू तिष्ठत होती. पण प्रत्यक्ष मेट्रो स्टेशनात पोचेस्तो किमान पाच तरी 'कुठून…

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ५

    लायब्र्यांचे दिवस ५

    कागदी पुस्तकांशी असलेलं पातिव्रत्य सोडून मला पहिला व्हर्चुअल व्यभिचार करायला लावला तो हॅरी पॉटरच्या अखेरच्या भागानं. जगभर पुस्तक प्रकाशित झालंय, लोक वाचतायत, पण आपल्याला वीकान्तापर्यंत प्रत मिळणार नाही हे असह्य होऊन मी मिळेल तिकडे सॉफ्टकॉपी हुडकायला सुरुवात केली. 'शोधेल तो पाणी…