मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

Khain tar tupashi

खाईन तर तुपाशी...

मेघना भुस्कुटे यांचा दुसरा ब्लॉग — खाईन तर तुपाशी...

१८ नोंदी

खाईन तर तुपाशी... · खाईन तर तुपाशी...

अजून ठरायचंय!

माझा आवडता पदार्थ मला कुणी विचारला की मला खरोखरच भंजाळायला होतं, कारण असा एक पदार्थ सांगणं अशक्य आहे. मला अन्नच मुळी मनापासून आवडतं. ते प्रेमानं करणारे, खाणारे, खिलवणारे, अन्नासोबतचं आपलं बरंवाईट नातं समजून घेणारे लोक आपले वाटतात. मैत्रिणीच्या आईबाबांपासून ते सहकारिणींपर्यंत आणि…

पुढे वाचा
  • · खाईन तर तुपाशी...

    कुळथाचंं पिठलं

    कुळथाच्या पिठल्यावर चकार शब्दही न काढता त्याला न्याय देण्यासाठीच तोंड उघडणं हाच त्याचा योग्य तो सन्मान असेल, अशी कबुली देऊन मगच मी त्याबद्दल चार शब्द बोलणार आहे. दुपारच्या जेवणाला, पाहुण्यांची सरबराई करण्याकरता, खास मेजवानीकरता करण्याचा हा पदार्थ नव्हे. घरचीच माणसं असताना,…

  • · खाईन तर तुपाशी...

    अंंबाडीचं सूप

    अंबाडीची भाजी माझ्या प्रचंड आवडीची. तुरीची डाळ, चिकट तांदुळाच्या कण्या, भिजलेले शेंगदाणे हे सगळं नि अंबाडीचा पाला एकत्र शिजवून घ्यायचा. मग पावभाजीच्या चेपणीनं चेपून हे सगळं - शेंगदाणे वगळता - चांगलं एकजीव करायचं. भरपूर तेलात लसणीच्या पाकळ्या कुरकुरीत करून घेऊन फोडणी करायची…

  • · खाईन तर तुपाशी...

    हार्डवेअर आणि मी

    माझं स्वतःचं स्वैपाकघर मांडून ते मोडायची वेळ येईस्तो मला लोकांचे त्यांच्या स्वैपाकघरातल्या भांड्यांशी असलेले संबंध कळतच नसत. ‘टिपिकल बायकी चाळे’ अशा असंवेदनशील लेबलाखाली ते जमा करून मी मोकळी होत असे. पण माझं स्वतंत्र स्वैपाकघर मांडताना खरेदी केलेली भांडी आकाशवाणीच्या स्वैपाकघरात…

  • · खाईन तर तुपाशी...

    द्रौपदीची थाळी

    माणसाला ज्या-ज्या कामांमध्ये मदतनीस न लाभणे म्हणजे त्याला गतजन्मीचं घोर पाप भोवणे असं मला मनापासून वाटतं, त्यांत कपड्यांना इस्त्री करणे या कामाच्या खालोखाल पालेभाज्या निवडणे या कामाचा नंबर लागतो. काय तो चविष्ट अन्नप्रकार नि काय त्याच्या सेवनाची ती महाकंटाळवाणी पूर्वतयारी. किती…

  • · खाईन तर तुपाशी...

    पोळ्या - एक अर्वाचीन छळ

    माझ्या स्वैपाकघरात घुसून वर आपला साटोपचंद्रीपणा पाजळणाऱ्या भोचक लोकांच्या खालोखाल त्रास जर मला कुणी दिला असेल, तर पोळीप्रेमी लोकांनी. आय हेट पोळी. चपाती. फुलका. घडीची पोळी. पुरणपोळी. आपापल्या सांस्कृतिक-राजकीय इतिहास-भूगोल-वर्तमानासह जे काय समजायचं असेल ते समजून घ्या. सगळ्याच्या…

  • · खाईन तर तुपाशी...

    फेण्या

    फेण्या हा निव्वळ एक पदार्थ आहे अशी तुमची समजूत असेल तर ती आधी दूर करा. तो एक सांस्कृतिक उपक्रम आहे. 'बर्‍याच दिवसांत फेण्या नाही बा झाल्या...' अशा एखाद्या कुरकुरसदृश पुसट वाक्यानं त्याची सुरुवात होते. असल्या निरुपद्रवी वाक्यांकडे सुरुवातीच्या टप्प्यावर संपूर्ण दुर्लक्ष करायचं…

  • · खाईन तर तुपाशी...

    व्यायामशाळा आणि कॅलर्‍या

    वैधानिक इशारा : वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारा माणूस दिसला रे दिसला, की काही लोक विनोदाच्या अपेक्षेनं आधीच खुळचटासारखे खिदळायला लागतात. हा लेख वाचणार्‍यांत असे नग असतील, तर त्यांनी माझा नमस्कार स्वीकारून ओसरीवरूनच तातडीनं निघण्याचं करावं. किलो आणि कॅलर्‍या'मध्ये तुम्हांला विनोद…

  • · खाईन तर तुपाशी...

    फराळ आणि मी

    खरं तर दिवाळीचा फराळ नि माझं लफडं तितकंसं सुरस नि रंगतदार नव्हे. "आमच्याकडे सगळ्यांना साट्याच्याच करंज्या आवडतात. होतो खरा व्याप. पण मुलांसाठी...", "मला नै बै विकत आणायला आवडत फराळ. मी घर्री करते सगळं. संस्कृती आहे ती आपली...", किंवा "हसायलाच लागल्या नं ग चकल्या! मग सऽऽगळं…

  • · खाईन तर तुपाशी...

    पोहे आणि मी

    रात्री-अपरात्री हातातलं पुस्तक बाजूला न ठेवता आल्यानं जागत बसावं आणि सहज दोन-अडीच उलटून जावेत. घर-दार झोपलेलं. आपल्या पोटात मात्र भुकेचा आगडोंब. हातातलं पुस्तक ठेवूनही काहीतरी खायला शोधलंच पाहिजे, अशी आणीबाणी आणणारा. अशा वेळी तुम्ही काय खाता? बिस्किटं? चिप्स? चिवडा? हॅट. पोट तर…