मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

कधीतरी

८ जुलै, २०२४ · अद्यतन ९ जुलै, २०२४

ध्यानीमनी नसताना,

कधीतरी कुणीतरी गाणं ऐकवतं,

फलक, गुजारिश आणि चांद असलेलं,

अथपासून इतिपर्यंत गुलजार.

टाकतं तिरपा कटाक्ष तेजतर्रार…

जीव उगाचच कातर-कासावीस झालेला असताना,

थांबता थांबत नाही पावसाची संततधार.

ध्यानीमनी नसताना,

सळसळत येतात कुठूनसे कवितांचे जहरी सर्प…

सरता सरत नाहीत ठसठसत्या रात्री -

काळ्यानिळ्या, गप्पगार.

मेघना भुस्कुटे

कविता

मूळ Blogspot पृष्ठ: meghanabhuskute.blogspot.com/2024/07/blog-post_8.html