मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

इतर

२२ नोंदी

  • · ब्लॉग

    नव्वदीच्या आगेमागे : राहून गेलेले तुकडे ०१

    शहरी घरात, चाळीत नि ऑलमोस्ट झोपडपट्टीत वाढले मी. काही वर्षं तर घर बांधकाम चालू असलेल्या इमारतीतच थाटलेलं होतं, कारण बिल्डर पळून जाईल अशी भीती होती. सांगायचा मुद्दा असा की माझं लहानपण काही निसर्गरम्य वगैरे खेड्यात गेलं नाही. नि तरी मला अनेक झाडं नि फुलं ओळखीची होती. कुंपणापाशी…

  • · ब्लॉग

    प्रार्थना

    खूप दिवसांनी इथली दारंखिडक्या उघडल्या. म्हणण्याजोगं, स्वतःचा आकार ल्यालेलं असं काही आज तरी मनात नाही. पण रांगोळी काढावीशी वाटावी वा प्रसन्न फुलं सजवून ठेवावीत, तसं काहीतरी वाटतंय. म्हणून हे. मी एका हिंदू ब्राह्मण, शहरी, शिक्षित कुटुंबात जन्मलेली व्यक्ती आहे आणि या सवर्णतेमुळे,…

  • · ब्लॉग

    बोडक्याची बहुभाषिकता

    एक काहीसं स्पष्टीकरण. हे काहीसं टारगट प्रकटन हिंदी, इंग्रजी वा संस्कृतविषयी नाही खरं तर. मराठी सोडून मला तोडक्या-मोडक्या येणार्‍या सगळ्याच भाषांविषयी मला असंच वाटतं. याची कारणं माझ्या भाषाविषयक धारणांमध्ये आहेत. कोणतीही भाषा आपल्याला आली असं म्हणताना माझ्या स्वतःकडून असलेल्या…

  • · ब्लॉग

    अवघड जागची भाषा!

    माझ्या शाळेतल्या मैत्रिणीनं सांगितलेला एक किस्सा आठवतो. आम्ही मराठी माध्यमाच्या शाळेत होतो. साहजिक कॉलेजमध्ये गेल्यावर इंग्रजीशी जुळवून घ्यावं लागलं. घेतलं. त्याचीही सवय झाली. त्या सुमारास कधीतरी ती आणि तिची एक मैत्रीण भर वर्गात व्याख्यान चालू असताना एकमेकींशी खुसफुसत बोलत…

  • · ब्लॉग

    to friends...

    'शाळेतली मैत्रीण ही माझी' असं म्हणून माझ्या ऑलमोस्ट चाळिशीच्या मैत्रिणीची ओळख करून दिली, की लोक एकदम आदरानं बघतात, हेच मला कमालीचं अचंबित करणारं वाटे. आमची मैत्री इतकी 'जुनी' असल्यामुळे वयोवृद्धांना भारतात दिला जातो तशापैकी अकारण आदर आपल्याला दिला जातोय असं वाटून चिडचिडही होई.…

  • · ब्लॉग

    कुठल्या जन्मीचं हे पाप?

    दोन्ही बाजूंना ॲस्बेस्टॉसाच्छादित एकेरी घरांच्या ओळी, मध्ये जेमतेम एका गटाराच्या रुंदीची पायवाट. त्यातच दोन्ही बाजूंना घरांच्या दरवाज्यांपाशी बैठे नळ आणि नळाच्या तोंडाखाली कपडे धुवायची फरशी. तिथून वाहणारं फेसाळ पाणी पायवाटेवरूनच उताराकडे धावत निघालेलं. क्वचित कुठे पायवाटेला पाखा…

  • · ब्लॉग

    व्हाया कागदपेन्सिलीशाईपेनं

    शाळेत असताना माझ्याकडे लाकडी चौकटीची दगडी पाटी होती. डब्बल. जाम जड व्हायचं दप्तर तिच्यामुळे. पण डब्बल दगडी पाटी ही अप्रूपाची गोष्ट असल्यामुळे मी ती प्रेमानं तश्शी वागवत असे. तिच्यावर रुळानी लिहिताना टकटक-टकाक-टक असा मस्त आवाज यायचा. बर्‍यापैकी लांबीची पेन्सिल एका विशिष्ट कोनात…

  • · ब्लॉग

    भांडणांची चैन परवडणारी नाही

    मी कधीही उजव्या विचारसरणीची समर्थक नव्हते. पण होता होईतो राजकीय घटनांवर थेट मतप्रदर्शन टाळत असे. ज्या विषयाचा आपला अद्ययावत अभ्यास नाही, त्या विषयात न पडण्याचं बंधन पाळत असे. पण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातली घटना, त्यानंतरचं सत्ताधार्‍यांचं वर्तन आणि त्या सगळ्याला सर्वसामान्य…

  • · ब्लॉग

    'आपण' यांना पाहिलंत का?

    मराठीत दोन प्रकारची अनेकवचनी प्रथमपुरुषी सर्वनामं आहेत. आम्ही आणि आपण. इंग्रजीत त्यांचं वर्णन exclusive we नि inclusive we असं करतात. हे मला माहीत होतं. पण त्याचं अधिक चपखल वर्णन मराठीतूनच करायचा प्रयत्न करत होते. ते काहीसं असं झालं : आम्ही : 1) बोलणारी व्यक्ती स्वतःला एखाद्या…

  • · ब्लॉग

    थँक्स शरलॉक, गुड बाय!

    हा समीक्षालेख नाही. समीक्षा करायला काहीएक तटस्थता कमवावी लागते, ती निदान या बाबतीत तरी माझ्यापाशी नाही. किंबहुना ती गमावण्याच्या प्रक्रियेबद्दल आभार मानण्यासाठीच हे टिपण आहे. एखाद्या गोष्टीला पूर्ण - कधीकधी अगदी पक्षपाती होऊन! - न्याय देऊन हवा असेल, तर मी त्या गोष्टीत…