मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ४

    लायब्र्यांचे दिवस ४

    शाळेत असतानाची बहुतेक वर्षं घरातल्यांचा मुख्य जाच जर काही असेल, तर तो म्हणजे हक्काची लायब्ररी नसणे. लहान मुलांची पुस्तकं पुरेनाशी झालेली आणि मोठ्यांची पुस्तकं वाचायला सेन्सॉर बोर्ड. परिणामी कुणीतरी भेट दिल्याशिवाय, कुण्या जबाबदार जाणत्या माणसानं सुचवल्याशिवाय, वा आईबापांनी वाचून…

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · ३

    लायब्र्यांचे‌‌ दिवस ३

    लायब्री म्हटल्यावर वास्तविक पुस्तकं आठवावीत. पण माझ्या गावातल्या मग्रसंच्या बाबतीत पुस्तकं ही एक गृहीत धरलेली बाब आहे. सरकारी लायब्र्यांमधली पुस्तकं जुनाट, पिवळी पडलेली, जीर्ण, फाटकीतुटकी असतात, वाचावीशी वाटत नाहीत… वगैरे राजपुत्री तक्रारी करणार्‍या लोकांशी वाद घालण्याच्या…

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · २

    लायब्र्यांचे‌‌ दिवस २

    आपल्या हक्काच्या शहरात असताना नाक वर करून, भवतालाला गृहीत धरून, आपल्याच तंद्रीत सुखेनैव चालणारी माणसं परक्या शहरात पडल्यावर जशी व्याकूळपणे आपल्या गावच्या खुणा हुडकत असतात; तसं होऊन मी बंगळूरच्या लायब्रीत गेले. आपण कुठल्यातरी अमराठी ठिकाणच्या महाराष्ट्र मंडळात जायचं आहे या…

  • · ब्लॉग
    लायब्र्यांचे दिवस · १

    लायब्र्यांचे दिवस १

    लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी…

  • · ब्लॉग
    नाटक · ३

    नाटक - ३

    अनेकदा पडलं आहे मला असं स्वप्न. कसं, कुठे वापरू त्याला असा तद्दन लेखकासारखा विचारही केला आहे मी अनेकदा. पण नाही जमलेलं. असं स्वप्न पडलं की काही चांगलं घडतं का, काही वाईट घडतं का... हाही एक नॉस्ट्राडेमसीय विचार अधूनमधून कुरतडत राहतो मनाला. पण बरेच दिवसांत स्वप्न पडलं नाही, की…

  • · ब्लॉग

    विंगेतली घरं

    एखादं घर आपलं वाटायसाठी त्या घरात प्रत्यक्ष राहावं लागतं थोडंच? पुस्तकातली घरं तर बोलूनचालून कल्पनेत रंगवलेली आणि त्यामुळे काहीशी स्वप्नील, अतिरंजित असणारच. पण सिनेमातली घरं? ती तर नजरेला स्वच्छ दिसतात. नि तरी त्यांतरेंगाळणारा वास कळतो. तिथे उकडत असेल, की गार वाटत असेल तेही…

  • · ब्लॉग

    राक्षस, पोपट आणि लिंगभाव

    राक्षसाचा प्राण जसा एखाद्या पोपटात असतो, तसा सांस्कृतिक दृष्ट्या परिपूर्ण अशा स्त्रीपुरुषांच्या लिंगभावाचा प्राण अनेक बाह्य पोपटांमध्ये विखुरलेला असतो, असं एक निरीक्षण आहे. होरक्रक्सच्या रक्षणार्थ तडफडणार्‍या व्होल्डरमटप्रमाणे हे स्त्रीपुरुष सदैव या जादुई पोपटांच्या संरक्षणाच्या…

  • · ब्लॉग

    टू देनिस विथ लव्ह...

    मला अमुक फार आवडते आणि मला तमुक अजिबात आवडत नाही... असा, रीतसर देनिसच्या टेम्प्लेटात लिहिण्याचा एक लेख बरीच वर्षे माझ्या शॉपिंग कार्टच्या आतबाहेर करतो आहे. चैनच ती. पण मनुष्याने मोहाला नेहमी शरण जावे या कुणाच्याशा मोहक सुविचाराला शरण जाऊन मी तो अखेर लिहिते आहे. \ \ \ लागलेली…

  • · ब्लॉग

    रस्ते

    रस्ते लक्ष्यात राहणे, रस्ते नीट कळणे आणि ते दुसर्‍याला समजावून सांगता येणे या सगळ्या प्रकाराबद्दलच मला एक जबरदस्त भयगंड आहे. माझ्या स्वतःच्या जन्मापासूनच्या गावात रस्त्यावरून अत्यंत निवांतपणे कुठूनतरी कुठेतरी जात असताना बहुधा माझ्या सहज आत्मविश्वासामुळे चकून एका निरागस बाईने मला…

  • · ब्लॉग

    मला समारंभ दचकवतात

    मला घरगुती समारंभ दचकवतात. आमंत्रणाच्या पायरीला ते खरेच निरुपद्रवी वाटू शकतात. कधी-कधी तर 'का बरं आपण यांना इतकं बिचकतो?' असा अचंबाही थोडा वेळ वाटावा, इतकी गोडगुलाबी-लालसोनेरी मजाबिजा त्यांत असल्याचं एकूण वातावरण असतं. पण जसजशी नव्हाळीची पंधरावीस मिनिटं उलटत जातात, तसतसा…