मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

साहित्यादि

२५ नोंदी

  • · ब्लॉग

    एक मोठी रेष...

    सुनीताबाईंबद्दल मी नव्यानं काय लिहिणार? त्यांचं सगळं आयुष्य महाराष्ट्राच्या पुढ्यात आहे. त्यातला निरलस कष्टाळूपणा, कठोर तत्त्वनिष्ठा, धारदार संवेदनशीलता, कमालीचं औदार्य, शास्त्रकाट्याची कसोटी लावणारी न्यायबुद्धी, कोवळं कविताप्रेम, परिपूर्णतावादी वृत्ती, पुलंच्या कामाचं त्यांनी…

  • · ब्लॉग

    या भवनातील गीत पुराणे...

    पुलंसंबंधी काही नकारात्मक म्हणणं मोठं कर्मकठीण आहे. एकतर माणूस अतिशय म्हणजे अतिशयच चांगला कलावंत - किंवा स्वतः पुलंच्या शब्दांत म्हणायचं तर खेळिया. अनेक क्षेत्रांत केलेला संचार. भाषेवरची जबरदस्त हुकूमत. लोकांना मोहवून टाकणारं बहुविध साहित्य. मी स्वतःच पुलंच्या साहित्याची इतकी…

  • · ब्लॉग

    गौरी : धाडसी प्रतिमानाच्या पलीकडे

    स्त्रीवादाच्या वाटेवरून जाणार्‍या कोणत्याही आधुनिक, मराठी साहित्यप्रेमी माणसाला गौरी देशपांडे हे नाव टाळून पुढे जाता येत नाही. तो एक अपरिहार्य टप्पा असतो, असंच तिचं लेखनकर्तृत्व आहे. कादंबरी, कथा, भाषांतरं, कविता, ललितलेखन अशा अनेक माध्यमांतून केलेला मुक्तसंचार; रचनेचे अनोखे…

  • · ब्लॉग

    केल्याने भाषांतर

    भाषांतरित पुस्तकं वाचून वैताग झाला आणि फेसबुकी एक लहानसं टिपण लिहिलं. त्यावर जी चर्चा झाली, ती अनेक प्रकारे फलदायी झाली. म्हणून मूळ टिपण, चर्चेअंती पडलेली भर आणि थोडे निष्कर्ष - अशी त्याच टिपणाची दुसरी आवृत्ती इथे देत आहे. \ \ \ अलीकडे काही भाषांतरित पुस्तकं वाचली. काही लहानपणी…

  • · ब्लॉग

    बाई - विजयाबाईंचा कॅलिडोस्कोपिक वेध

    बाई : एका रंगपर्वाचा मनोहर प्रवास संपादन : अंबरीश मिश्र राजहंस प्रकाशन एखाद्याचं आत्मवृत्त ('लमाण' - डॉ. श्रीराम लागू) किंवा निरनिराळ्या व्यक्तिसापेक्ष कोनांतून इतरांनी रेखाटलेलं त्याचं व्यक्तिचित्र ('तें आणि आम्ही') या दोन्ही घाटांची पुस्तकं मराठी नाट्यवर्तुळात आहेत. खुद्द…

  • · ब्लॉग
    इतक्यात वाचलेली पुस्तकं · १

    इतक्यात वाचलेली पुस्तकं ०१

    आणि मग एक दिवस... (जालावरून साभार) पुस्तक रंजक आहे, यात शंका नाही. त्याचं सगळं श्रेय नसीरच्या दिलखुलास निवेदनाला आणि धारदार विनोदबुद्धीला. पण त्यातून त्याच्या अभिनयपद्धतीबद्दल काही महत्त्वाचं वाचायला मिळेल, असं म्हणता? सॉरी! बहुतांश नटांनी नोंदलेली नटाची लक्षणं नसीरनंही नोंदली…

  • · ब्लॉग

    दिवाळी २०१५, अंक दुसरा : साधना

    \[प्रतिमा उतरवता आली नाही\] 'मिळून सार्‍याजणी' किंवा 'पालकनीती'सारख्या चळवळीतल्याच अंकांचा अपवाद सोडला, इतर भल्या भल्या साहित्यिक दिवाळी अंकांना जे जमलेलं आणि / किंवा सुचलेलं नाही, ते 'साधने'नं सुमारे ५-६ वर्षांपूर्वीच करायला सुरुवात केलेली आहे. ते म्हणजे ऑनलाईन आवृत्ती उपलब्ध…

  • · ब्लॉग

    दिवाळी २०१५, अंक पहिला : मौज

    मोबाईलच्या पडद्यावर न मावेल इतकं दीर्घ काही लिहायचं नि वाचायचं झालं, तर मुख्यधारेतली मराठी माध्यमं कमालीची मर्यादित आहेत. दखल घ्यावी अशी मासिकं नि साप्ताहिकं हातांच्या बोटांवर मोजण्याइतकी. अनियतकालिकांची चळवळ ओसरूनही जमाना झाला. वृत्तपत्रांमध्ये प्रथम प्राधान्य जाहिरातींना आहे –…

  • · ब्लॉग

    परत रेषेवरची अक्षरे

    २०१२ मधे 'रेषेवरची अक्षरे'चा शेवटचा अंक काढला तेव्हा ब्लॉगवरचं चांगलं लिखाण आटत चाललंय याचं दुःख तर होतंच. पण तो अंक करताना होणारी ई-पत्रांची देवाणघेवाण, चर्चा, वादविवाद, गॉसिप्स आणि भंकस, उलगडत जाणारे नवनवीन ब्लॉग्स... हे सारं संपणार याची खंतही होती. मधल्या काळात आम्ही ब्लॉग…

  • · ब्लॉग

    "रानी कुठून आलो? गाऊन काय गेलो?"

    आज भारांचा १०५ वा वाढदिवस. ’ऐसी अक्षरे’ या संस्थळावरच्या मित्रांसोबत ’भा. रा. भागवत विशेषांक’ नामक एक मोठा उपक्रम पार पाडला आणि भारांच्या वाढदिवसाचा मुहूर्त साधून प्रकाशित केला. त्याच्या समारोपाची ही नोंद. अंक जरूर वाचा. एकमेकांना पाठवा. प्रतिक्रिया नोंदवा. नेहमीप्रमाणे सूचनांचं…