लायब्र्यांचे दिवस १
लहानपणी अनुभवलेल्या अनेक जागा आपल्या तत्कालीन आकाराशी इमान राखून असल्यामुळे आपल्याला मोठ्या भासलेल्या असतात. पण मोठेपणी तिथे गेलं, की ‘इतकुशीच होती ही जागा?’ असा विश्वासघात होऊन खट्टू व्हायला होतं. माझ्या पहिल्या लायब्रीच्या बाबतीत तसं होण्याची वेळ सुदैवानं कधीच आली नाही. मी…