मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

कविता

११६ नोंदी

  • · ब्लॉग

    एरवी

    वेळोवेळी शब्दांचा फास पडला आहे मला.

    त्यांचं प्रेम नाही असा दावा नाही.

    मनापासून भोगले शब्द.

    याचा अर्थ बाकी कशात राम नव्हतासा नाही.

    निवडीच्या भासाचे जे फासे पुढ्यात पडले,

    …

  • · ब्लॉग

    चार दिवस, चार कविता

    आपण एखादी कविता वाचतो, ऐकतो; तेव्हा तिच्यातले शाब्दिक खेळ, भाषाशैली, अलंकारांची गंमत... इतकंच अनुभवत नसतो फक्त. आपल्या आयुष्यातला कुठलातरी अनुभव, कुठलातरी काळ, कुठलीतरी आठवण त्या कवितेशी नातं सांगत असते. कविता ऐकता-वाचताना नकळत पार्श्वभूमीमधून जागी होऊन पुढे येऊन उभी राहत असतो. तिच्याशी आपण कवितेचं मॅपिंग करतो. दोन्ही आपल्या डोक्यात एकजीव होऊन जातात. मग तिथून पुढे कधीही कविता ऐकली, की आपल्या डोक्यात हे सगळं एकसंधच जागं होतं. एखादी कविता मी जेव्हा वाचून वा म्हणून दाखवते, तेव्हा मी माझ्या डोक्यात तिला लगडून असलेल्या अनुभवाबद्दलही सांगितलं तर?

    मी तसं केल्यामुळे इतरांच्याही कविताविषयक आठवणीत माझी आठवण ओवली जाईल?

    मला माहीत नाही. ते पाहायचं होतं म्हणून हा प्रयोग फेसबुकावर केला. तो इथे एकत्र करून ठेवते आहे.

    \\\*

    # सखे गं सये

    …

  • · ब्लॉग

    काही नाही

    यंदा

    सोसासोसानं काही नवं विकत घेणार नाही.

    इक्कत, कलमकारी, बाटिक, डबल ढाबू, जयपुरी सूत, ठशाचं सूत, बांधणी... काही नाही.

    वाकवलेल्या तारांचे, पांढऱ्या धातूचे, वाळवलेल्या नि भाजलेल्या मातीचे, लाकडी कोरीवकामाचे, रंगीत लाकडांचे, चमकदार दगडांचे, हत्तींचे नि घुबडांचे, हरणांचे नि सशांचे, मांजरांचे नि पाखरांचे...

    कसले म्हणून नवे कानातले नाही.

    …

  • · ब्लॉग

    नकोच

    काय हवं?

    नावगाव?

    घरदार?

    मूलबाळ?

    शेजसंग?

    …

  • · ब्लॉग

    कुठून?

    कुठून सरसरत उगवून येतो माझ्यात

    एखाद्यावरचा असा काळ्या कभिन्न कातळासारखा ठाम विश्वास,

    एखाद्याच्यात डोकावून पाहण्याची नवथर, तांबूस-कोवळी, लवलवती उत्सुकता,

    एखाद्याच्या अंगाला पाठ देत निःशंक रेलण्यातलं अपरंपार निळंशार सुळकेदार धाडस,

    काळजीपूर्वक, श्वास रोखून आपण भरत जावेत चित्रात रंग,

    …

  • · ब्लॉग

    फारतर

    इच्छांच्या लाटांवर लाटा धडकत राहतात

    तिथे खाऱ्या पाण्याचे सपकारे झेलत,

    भिजत-थरथरत,

    पाय रोवून मी बेमुर्वतखोर उभी राहते

    मौनाच्या उंचच उंच काळ्याकभिन्न निर्दय भिंतीसारखे

    …

  • · ब्लॉग

    पर्याय

    माझ्यापाशी पर्याय असत नाहीत.

    पहाट विझत येतानाच्या धुवट उजेडात स्वैपाकघराच्या ओट्यापाशी उभी राहून,

    मी बाहेरची अर्धवट झोपेतली झाडं न्याहाळत असते अर्धवट जागी होऊन,

    लालचुट्टूक बुडाची, निळ्याकबऱ्या मानेची नाचरी पाखरं न्याहाळत,

    मला कधी ठाऊकच नसलेली त्यांची नावं बिनदिक्कत भुर्र उडवून लावते,

    …

  • · ब्लॉग

    कामं संपली की...

    कामं संपली सगळी,

    की मी मस्त दहा वाजेपर्यंत झोपणार आहे काही दिवस.

    काही म्हणजे काही न करता नुसती लोळत, सिनेमे बघत, पुस्तकं चाळत पडून राहणार आहे दिवसचे दिवस.

    मनात आलं, तर उठून आफ्रिकेतही जाईन फिरायला.

    पण आखणार नाही काहीसुद्धा.

    …

  • · ब्लॉग

    आता उच्चारही करवेना

    आता उच्चारही करवेना

    असं नि इतकं -

    अगदी राहवेना झालंय बघ.

    मुळांपासून फळांपर्यंत.

    तहान नव्हे ही.

    …

  • · ब्लॉग

    बाई

    भल्या भल्या देखण्या अप्सरा

    नवल करत बसतात,

    त्यांना काही केल्या उमगत नाही,

    माझ्या देखणेपणाचं गुपित कशात?

    मी काही चिकणीचुपडी गोडगुलाबी नार नाही

    …