मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

मालिका

राहत्या शहराचे लागेबांधे

७ भाग, कालानुक्रमाने

  1. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · १

    राहत्या शहराचे लागेबांधे ०१

    वास्तव्याच्या ठिकाणांशी, शहरांशी, रस्त्यांशी आणि सार्वजनिक जागांशी.. आपले लागेबांधे जोडले जातात. आपल्या वरकरणी विनाकारण बदलत्या मूड्सवर त्यांची छाया असते. ते छायाप्रकाश पकडण्याचा हा प्रयत्न. \ \ \ एरवी लोकल ट्रेनमध्ये बसल्यावर खूश व्हायला व्हावं अशा अनेकच गोष्टी असतात. पण जर…

  2. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · २

    राहत्या शहराचे लागेबांधे ०२

    भाग ०१ \ \ \ माझा त्या गावावर तसा राग नाही. पण लोभही नाहीच. त्याच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि भाषिक महिरपी मला अजिबात बिचवकत नाहीत. बिचकवणारही कशा म्हणा - मी गावात शिरते, तीच मुळी त्यानं वेशीच्या पल्याड नवश्रीमंत उठवळपणानं पसरलेले हातपाय निरखत. माझ्यापाशी माझ्या माहेरच्या…

  3. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ३

    राहत्या शहराचे लागेबांधे ०३

    भाग ०१ । भाग ०२ \ \ \ आजोळ म्हणजे हमखास मऊ-रेखीव आणि रम्य असलंच पाहिजेत असा एक अलिखित नियम आहे. मी मात्र निर्णयस्वातंत्र्य येताक्षणी ते गोंधळवणारे प्रवास हाणून पाडायला सुरुवात केली, त्यामागे फार काही मेलोड्रॅमेटिक दुःखी कारणं होती असं नव्हे. ज्या गोष्टींनी फार भारून जाण्याची,…

  4. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ४

    राहत्या शहराचे लागेबांधे ०४

    भाग ०१ । भाग ०२ । भाग ०३ \ \ \ माझा एक म्यानेजर मित्र आहे. पहिल्या नोकरीच्या काळात सगळीकडूनच झिलई चढायची असतानाच्या आणि अंगच्या रानवट उद्धटपणाची कोवळीकही ओसरलेली नसतानाच्या दिवसांपासूनचा. आमच्यात चकमकी झडत बर्‍याच. पण गप्पाही होत कसल्याही आडव्यातिडव्या, तुरळक आणि घनदाट.…

  5. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ५

    राहत्या शहराचे लागेबांधे ५

    भाग १ । भाग २ । भाग ३ । भाग ४ \ \ \ कधीकधी स्वप्नातून धसकून जाग येते आणि जाग आलीय की नाही याचाही धड पत्ता लागत नाही. अशा अर्धजागृतीच्या रेषेवर घुटमळत असताना, उठून शू करायला जायचं असतं खरंतर. पण नक्की कोणत्या दिशेनं गेल्यावर या वास्तूची बाथरूम सापडेल त्याबद्दलही संभ्रम. पोटात…

  6. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ६

    राहत्या शहराचे लागेबांधे ६

    टळटळीत दुपारी आसमंतावर पेंग चढत असताना तळ्यावरून चालत निघावं. तळं म्हटल्यावर जे काही डोळ्यासमोर येतं त्याला छेद देणारी दृश्यं असतात. वाहत्या रस्त्याकाठी झाडांची सावली नि फरशीचा थंडगार कट्टा धरून काहीही न करत बसलेले, वृद्ध दिसणारे, थकलेले लोक. कुणी डब्यातली सुकी चपाती चाबलणारा.…

  7. · ब्लॉग
    राहत्या शहराचे लागेबांधे · ७

    राहत्या शहराचे लागेबांधे ०७

    ग्लोबल कंटाळ्याचे ढग डोक्यावर जमा होत असताना कानात गुंड्या खुपसून शहरातल्या रस्त्यांवरून चालत सुटावं. काही लावू नये गुंड्यांवर, पण असू द्याव्यात त्या कानात. लोक आपल्याला तिरशिंगराव समजून दूर राहतात. पहिली साताठ मिनिटं आपण आपल्या डोक्यात तडमडत राहतो. मग मात्र कुरकुरलेले आपण…