समस्यापूर्ती
पाळी येण्यापूर्वीच्या आठवड्यात कितींदा
संतप्त अनावर रडून लिहिल्या आहेत कविता
कुणीतरी हिशेब केला पाहिजे कधीतरी एकदा
कितीतरी भ्रम मग खळखळा फुटतील
प्रेमाचे-वात्सल्याचे-मैत्र्यांचे नि मत्सरांचे
…
टॅग
७ नोंदी
पाळी येण्यापूर्वीच्या आठवड्यात कितींदा
संतप्त अनावर रडून लिहिल्या आहेत कविता
कुणीतरी हिशेब केला पाहिजे कधीतरी एकदा
कितीतरी भ्रम मग खळखळा फुटतील
प्रेमाचे-वात्सल्याचे-मैत्र्यांचे नि मत्सरांचे
…
भल्या भल्या देखण्या अप्सरा
नवल करत बसतात,
त्यांना काही केल्या उमगत नाही,
माझ्या देखणेपणाचं गुपित कशात?
मी काही चिकणीचुपडी गोडगुलाबी नार नाही
…
कलावंताला लिंग नसतं असं म्हणतात. पण आज जिवाजवळच्या, सोबत करणार्या लेखकांची नावं आठवत गेले, त्यात आश्चर्यकारक प्रमाणात बाया निघाल्या. अपवाद होतेच. चांगले सणसणीत अपवाद होते. पण ते अपवादच. नियम अधोरेखित करणारे.
बाई असणं इतकं निराळं करतं माणसाला? लेखकाला? कलावंतालाही? की आस्वाद घेण्यातली ही आपली मर्यादा? की सवयीचं-सरावाचं तेच आपलं मानण्यातला बथ्थड आळस? की खरंच जैविक-सांस्कृतिक बंध? कुणास ठाऊक.
आजच्या महिलादिनाच्या निमित्तानं या काही कविता. सोबत करणार्या.
रंगीबेरंगी इच्छांच्या रथात बसून
दूर निघालेल्या एका उत्कट मुलीची गोष्ट
…
संवेदचा खो घेऊन या कविता पोस्ट करतेय -
हरिलाल
खूप उशिरा ओळख पटत जावी एखाद्याची
तसे जाता जाता
एकमेकांना आवडू लागलेले आपण
…
आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.
नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.
वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.
दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.
नाही. ही सवयही नाही.
…
नंदन, टॅग केल्याबद्दल मनापासून आभार. ’जे जे उत्तम...’मागची नंदनची भूमिका इतकी नेमक्या शब्दांत मांडलेली आहे, की ती तशीच्या तशीच इथे देते: (पुस्तक वाचताना, अनेकदा काही परिच्छेद आवडतात. संपूर्ण पुस्तकाचा विचार केला तर ते कदाचित तितके महत्त्वाचे नसतीलही; पण त्या त्या वेळेला ते आवडून…
शिल्पा आणि रिचर्ड गिअर यांच्यावरून आपल्याकडे जे रामायण चाललंय, त्यावर काही प्रतिक्रिया व्यक्त करणं म्हणजे येडेपणाच आहे.
पण विंदांच्या खास शैलीतली ही कविता मात्र आठवतेय. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर ती आठवताना काही औरच मजा येतेय!
विंदा म्हणतात -
तुझिया ओठांवरचा मोहर मम ओठांवर गळला ग,
अन् आत्म्याच्या देव्हाऱ्यातुन गंध मधुर दरवळला ग
…