मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

श्रेणी

काहीबाही

७६ नोंदी

  • · ब्लॉग

    गरज

    १. 'साले माजलेत...' या उक्तीखेरीज ज्यांचं वर्णन अपुरं ठरतं असे रिक्षावाले. २. जुनी, पिवळी पडलेली पुस्तकं मेहेरबानी केल्याच्या थाटात पुरवणारं सरकारी वाचनालय आणि तिथले कर्मचारी. ३. सदैव कशासाठी तरी उकरून ठेवलेले आणि ट्रॅफिकनं बुजबुजलेले रस्ते, झाकणं चोरीला गेलेली गटारांची असहाय्य…

  • · ब्लॉग

    वार्‍याने हलते रान...

    सहसा काम करण्यासाठी ही अशी जागा मिळणं दुरापास्त. दोन्ही टोकांना धडधडणार्‍या शहरांच्या मधे वसलेला हा निवांत पट्टा. कसलेच गज नसलेली मोठ्ठीच्या मोठ्ठी सरकखिडकी. समोर खाडी. खाडीला समांतर जाणारे निर्लेप संन्यस्त रूळ. अद्याप माणूसपणा शाबूत असलेला शांत फलाट. खाडीचं वेळीअवेळी…

  • · ब्लॉग

    जोवर फुलांच्या बागा फुलताहेत...

    आजच्या संध्याकाळीला भेसूर चेहरा नाही.

    नाही. कसलाच तात्पुरता मुखवटाही नाही.

    वेळ भरत राहण्याचा, स्वतःपासून पळत राहण्याचा शाप नाही.

    दिवस पुरता अर्धमेला झाल्यावरच घराकडे परतण्याचा धाक नाही.

    नाही. ही सवयही नाही.

    …

  • · ब्लॉग

    क्यूँ नये नये से दर्द कि फ़िराक मे तलाश मे...

    क्युबिकलमधे हातपाय झाडून त्याला 'एरोबिक्स' म्हणायची सवय लावून घेऊन तसे बरेच दिवस झाले. ते करताना चेहरापण निर्विकार ठेवता येतो आता. भिवया उंचावल्या जात नाहीत आणि फिस्सकन हसायला येणार नाही याचीपण ग्यारण्टी देता येते. जेवायला जाताना अडीच सेंटीमीटरचं स्माइल, 'बाय' म्हणताना दीड…

  • · ब्लॉग
    नाटक · १

    नाटक

    सगळं तसं वाह्यात संतापजनकच. तुपकट लग्नसमारंभी उत्साह. नाटकाच्या वेळाशी अजिबात देणंघेणं नसल्यासारखी निवांत सरबराई. खाणं-पिणं, साड्यांचे लफ्फेदार पदर, गजरे-अत्तरं आणि भेटीगाठी. आता आलोच आहोत तर बघून टाकू नाटकपण, असा एकंदर नूर आणि आव मात्र संस्कृतीच्या जपणुकीची धुरा वाहायची…

  • · ब्लॉग

    ऋतू

    इथे सध्या कुठला ऋतू आहे कुणास ठाऊक. पण हवा अगदी नितळ सुरेख आहे. दुपारी अडीचच्या सुमारास घरी परततानाही त्या स्वच्छ सोनेरी हवेची आभा सगळीभर पसरून असते. रस्त्यावर डेरेदार झाडांची कमतरता नाहीच. पण त्यांच्या हिरवेपणात तजेला तरी किती! उन्हानं नुसती झगमगत असतात. त्यांच्या हिरवेपणात ऊन…

  • · ब्लॉग

    जगता जगता...

    गर्भाशयातल्या अंधाराची स्पष्ट आठवण नाही उरली जगता जगता. काही पुसट हृदयखुणा फक्त. काही अनोख्या शांततेचे निरव प्रदेश. सगळी दु:खं विसरून विसावावं अशा काही अंधार्‍या ऊबदार जागा. कसल्याही हक्कांविना पोटाशी घेणारे काही कोवळ्या सावलीचे दगडी पार.. अशा प्रदेशांचे पत्ते नसतात कधीच. चालता…

  • · ब्लॉग

    ...अफलातूनच!

    आपण कुठे येऊन, कुणाबरोबर आणि नक्की काय करतोय असा प्रश्न पडून हिस्टेरिकली हसायला येणं एकूण अफलातूनच. उदाहरणार्थ ऑफीसमध्ये एका भिकार डॉक्युमेण्टमध्ये लक्ष घालण्याचा प्रयत्न करून मी प्रचंड दमलेली. आत्ता चहासाठी ब्रेक घेतल्यास किंवा निवांतपणे गूगल टॉक उघडल्यास नवा मॅनेजर आपल्यावर…

  • · ब्लॉग

    शो मस्ट गो ऑन, यू नो!

    कविता. युद्ध. शृंगार. लालभडक मत्सर. रक्तपात-दंगली-खून. चळवळी-क्रांत्या आणि पुन्हा पुन्हा जन्म घेणारी कविता. एकाच चिरंतन तत्त्वाचं अव्याहत चक्र जणू... आपल्या सगळ्यांमधलं हे जे स्पिरिट असतं ना, त्याला संस्कारांनी खूप आकार-उकार देतो आपण. वेळोवेळी काबूत ठेवतो स्वत:चेच सगळे अनावर…

  • · ब्लॉग

    रायटर्स ब्लॉक

    बिनओळींच्या कागदावर लिहिण्यातली गंमत काही औरच. कोरा करकरीत कागद आणि आपण. अधेमधे साधा ओळींचाही आसरा नाही. आपण संपूर्ण निराधार. समोर काहीतरी अफाट सुंदर अंतहीन पसरलेलं असावं अशी मन दडपून टाकणारी, पाऽऽर एकटं वाटायला लावणारी भावना. ’सर्वांगानं भिडावं - काय होईल ते होईल’ अशी उद्धट ओढ…