मुख्य मजकुराकडे जा
मेघना भुस्कुटे

टॅग

सिनेमा

२६ नोंदी

  • · ब्लॉग
    होय, मी हे अजून बघितलं नव्हतं · १

    होय, मी हे अजून बघितलं नव्हतं - १

    अमोल उदगीरकरच्या 'न-नायक'चा एक निराळा परिणामही झाला. मधल्या काळात प्रियकर, प्रेमभंग, मैत्र, मैत्रभंग या सगळ्या हार्मोनल भानगडींमध्ये मेनस्ट्रीम हिंदी सिनेमे बघणं या आपल्या अवतारकार्यावरून आपलं लक्ष्य भलतंच विचलित झालं असल्याचा साक्षात्कार झाला, अपराधीपण आलं. परिणामी 'न-नायक'…

  • · ब्लॉग

    ऋषीला सलाम...

    त्याचं सहज वावरणं, अभिनय न भासणारा अभिनय त्याच्या रूपापुढे झाकोळून गेल्याची जी भावना शशी कपूरच्या जाण्यानं सर्वत्र व्यक्त झाली, तिनं मी दचकले. ऋषी कपूर हा माझा फार लाडका नट. त्याच्या कामाबद्दल आपण कधीच काही बोलत नाही हा माझा जुना सल. आता तोही व्यक्त करायला आपण त्याच्या जाण्याची…

  • · ब्लॉग

    कायमचे सिनेमे

    खूप सिनेमे आवडतात. सिनेमे खूप आवडतात. पण कधीही कुठूनही मधूनच बघायला घेऊन मज्जाच येईल असे सिनेमे मोजकेच. असे सिनेमे आपल्याला कित्तीही जवळचे असले तरी सिनेमे म्हणून लई भारी असतील, असं नाही. पण आपण त्यांच्यासह वाढलेले असतो, लागेबांधे असतात, त्यांतल्या पात्रांशी जुळलेलं असतं काहीतरी.…

  • · ब्लॉग

    नॉस्टाल्जिया

    'लोकसत्ते'च्या गुरुवारच्या 'रंगतरंग' पुरवणीत एक सदर असे. एखादं आडवाटेचं सिनेगीत, त्याचं चित्रण आणि सूर, शब्द आणि अभिनय यांबद्दलचं रसग्रहण. जेमतेम दोन-अडीचशे शब्द. एखादा फोटो. त्या सदराची फार आठवण झाली. फारदा. म्हणून. ‍ अजून नायक-नायिकेत प्रेमाचा इजहार व्हायचाय. आकर्षणाचा एक…

  • · ब्लॉग

    थॅंक्स टू हिंदी सिनेमे १

    कणेकरांच्या ‘फिल्लमबाजी’मध्ये एक पुचाट, सेक्सिस्ट न-विनोद असायचा. बायकोला सिनेमाला ‘नेणे’ आणि मग ‘हव्या तितक्या साड्या बघ, मागू नकोस!’ असं म्हणणे. माझ्या शाळकरी वयातही मला त्यात काही विनोदी वाटलं नव्हतं. भिवई वर गेली होती. पण ‘इंग्लिश विंग्लिश’मधल्या श्रीदेवीच्या एक से एक साड्या…

  • · ब्लॉग

    जो हुआ करता हैं फिल्मों में हमेशा..

    सिनेमाची भाषा फक्त शब्दांची असत नाही, तशीच ती फक्त चित्रांचीही असत नाही. रंग, आकार, उजळपणा वा काळोख, मांडणी, पुनरावृत्ती वा अभाव; ध्वनी, संगीत, सूर; शब्द, संवाद, सामाजिक-सांस्कृतिक संचितातून आलेली प्रतीकं आणि त्यांना लगडून येणारे विशिष्ट अर्थ; त्यांची निवड करताना लावलेली चाळणी –…